बोगस काम करून उचलले साडेचार लाखाचे बिल, संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी


परंडा |

सिरसाव गावाचे ग्रामदैवत असणाऱ्या महालक्ष्मी मंदिर व जिल्हा परिषद मधील शाळेत आरो प्लांटचे काम बोगस दर्जाचे काम केले आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरने प्रशासनातील काही अधिकाऱ्याला हाताशी धरून सुमारे साडेचार लाखाची रक्कम लाटल्याची तक्रार सिरसाव गावातील सामाजिक कार्यकर्ते आनंद जाधव व शिवसेना नेते श्रीगणेश चोबे यांनी संबंधित यंत्रणेकडे केली आहे. यासंदर्भात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांच्याकडे तक्रार दिली असता, तुमच्या ग्रामपंचायत कडून हे दोन्ही प्रोजेक्ट बसवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 

या कामाला पंधराव्या वित्त आयोगातून मंजुरी मिळाली होती,
ग्रामस्थांना व शाळकरी मुलांना चांगल्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने निविदा प्रक्रिया काढून हे काम करण्यात आले आहे. परंतु जलशुद्धीकरण यंत्र न बसवता काम पूर्ण झालेला फलक मात्र फक्त लावलेला आहे. या गैरप्रकाराची कसून चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी ही करण्यात आली आहे.

सुमारे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषद च्या शाळेत अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे एक शोकांतिकाच आहे. विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा न लावल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी आनंत जाधव, श्रीगणेश चोबे, गजानन पाटील, पांडुरंग चोबे, रामेश्वर चोबे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.



Post a Comment

0 Comments