श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षा विभागाच्या सतर्कतेने चोर महिला पोलिसांच्या हवाली



आज सकाळी मंदिर परिसरात संशयास्पद हालचाली करत असलेल्या दोन महिलांना सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा पर्यवेक्षकांनी तत्परतेने पकडले. या महिला मंदिर परिसरात भाविकांचे पर्स, मोबाईल  चोरण्याचा प्रयत्न करत असताना रंगेहात पकडल्या गेल्या. 

मागील काही दिवसांपासून मंदिर प्रशासनाची सुरक्षा यंत्रणा चोरीच्या घटना घडू नये यासाठी प्रयत्नशील आहे. याच सतर्कतेने या 2 महिलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी मंदिर संस्थानचे सुरक्षा निरीक्षक ऋषीकेष पाटील, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक ऋषभ रेहपांडे, सुरक्षा पर्यवेक्षक योगेश फडके उपस्थित होते. या घटनेमुळे मंदिर परिसरातील भाविकांकडून सुरक्षा विभागाचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments