माय-लेकीचं एका व्यक्तीसोबतच अफेअर; प्रियकराला सोबत मायलेकीने बापाचाच घोटला गळा

एकाच व्यक्तीसोबत आई आणि मुलीचे अनैतिक संबंध सुरू होते. एक महिन्यापूर्वीच महिलेच्या पतीने  तिला आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. त्यानंतर पती आणि पत्नीमध्ये वाद होऊ लागले. शुक्रवारी रात्री जेव्हा घरातील सर्व सदस्य झोपले होते तेव्हा आई, मुलगी आणि प्रियकर या तिघांनी मिळून घरातील प्रमुखाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली आणि मृतदेह अंगणातच  पुरला. मृतदेह जिथे पुरला, ती जागा विटांनी झाकून टाकली.  ही घटना भागलपूर  जिल्ह्यातील सन्हौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बड़ी रमासी गावातील आहे.

असा झाला सारा प्रकार उघडकीस
कैलूचा सर्वात मोठा मुलगा दयानंद  हा बांका जिल्ह्यातील रजौन येथे राहून साफसफाईचे काम करतो. हॉटेल चालवताना सरिता देवी आणि मुलगी जुली हिची अनेकांशी ओळख झाली. याच दरम्यान पलवा गावातील युवक दिनेश यादव हॉटेल आणि त्यांच्या घरी ये-जा करू लागला. या तिघांच्या संबंधावरून कैलू आणि त्याच्या पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत असे. सोमवारी कैलूचा मोठा मुलगा दयानंद कुमार जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याला त्याचे वडील दिसले नाहीत. त्याने आई आणि बहिणीला याबाबत विचारले असता, दोघींनीही समाधानकारक उत्तर दिले नाही.

यानंतर त्याने गावकऱ्यांकडेही चौकशी केली. पण काहीच माहिती मिळाली नाही. तो पोलीस ठाण्यात वडिलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवण्यासाठी गेला. जेव्हा सरिता देवी आणि मुलगी जुलीला याची माहिती मिळाली तेव्हा त्या दोघीही पोलीस ठाण्यात पोहोचल्या. तिघेही पोलीस ठाण्यात बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवत होते, त्याचवेळी गावकऱ्यांनी पोलिसांना फोन करून सांगितले की कैलूच्या घराच्या अंगणातून दुर्गंध  येत आहे. त्यानंतर ठाणेदार ब्रजेश कुमार पोलीस दलासह घटनास्थळी पोहोचले आणि अंगणात खोदकाम करून मृतदेह बाहेर काढला. 

आई-मुलीला अटक; प्रियकर फरार
गावकऱ्यांनी घटनास्थळापासून काही अंतरावरच पोलीस ठाण्यातून परतणाऱ्या आई आणि मुलीला पकडून बेदम मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दोघींना अटक करून पोलीस ठाण्यात नेले. चौकशीदरम्यान दोघींनी आपला गुन्हा कबूल केला. ठाणेदारांनी सांगितले की, या घटनेत सामील असलेला दिनेश यादव याचा महिलेशी आणि तिच्या मुलीशी अनैतिक संबंध होता. तिघांनी मिळून कैलू यादवची हत्या करण्याचा कट रचला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अनैतिक संबंधातून घडलेल्या या हत्येमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत

Post a Comment

0 Comments