प्रियकराचा लग्नाला नकार, प्रियसीने उचलले धक्कादायक पाऊल


प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हिंजवडी येथे ही घटना घडली.

आत्महत्या केलेल्या १९ वर्षीय तरुणीच्या वडिलांनी (४०, रा. हिंजवडी, मूळ रा. भोगलगाव, जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. १) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सुबोध सुधीर साखरे (२५, रा. साखरे वस्‍ती, हिंजवडी), रोहन सुदाम पारखी (३०, रा. मुलानी वस्‍ती, माण, ता. मुळशी) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यासह सुधीर साखरे, सुबोध साखरे याची आई आणि एक महिला या संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सुबोध साखरे याच्यासोबत फिर्यादी यांच्या १९ वर्षीय मुलीचे काही वर्षांपासून प्रेम संबंध होते. फिर्यादी यांच्या मुलीने त्यास लग्न करण्यसाठी तगादा लावला. परंतु सुबोध आणि त्याचे नातेवाईक यांनी आपसात संगणमत करून लग्नास नकार दिला. काहीही झाले तरी लग्न लावून देणार नाही, असे म्हटले. यामुळे फिर्यादी यांची मुलगी तणावाखाली येऊन तिने फिर्यादी यांच्या राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Post a Comment

0 Comments