महाराष्ट्रात गौतमी पाटीलची चांगलीच क्रेझ आहे. दिवसेंदिवस गौतमीची फॅन फाॅलोइंग सुद्धा वाढताना दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी गौतमी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर कायम नवनवीन फोटो व्हिडीओ शेअर करत असते. गौतमीला आपलं नृत्य सादर करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात बोलवण्यात येतं. दरम्यान, दहीहंडी निमित्त गौतमीच्या डान्स शो अमरावती येथे अयोजित करण्यात आला होता. त्यावेळेस गौतमीसोबत एक भयानक प्रकार घडला.
नेमकं काय घडलं?
गौतमीचा कार्यक्रम अमरावती येथीस अचलपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने आयोजित करण्यात आला होता. मनसेच्या या भव्य दहीहंडी उत्सवाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक नामवंत गोविंदा पथकांनी हजेरी लावत या उत्सवात एकच जल्लोषाचं वातावरण तयार केलं होतं. दरम्यान, या वेळी गौतमीचा कार्यक्रमात आग लागल्याने एकच खळबळ उडाली.
स्टेजवर आग-
गौतमीचा डान्स पाहण्यासाठी लाखो लोकांची गर्दी झाली होती. दरम्यान, गौतमीचा कार्यक्रम सुरु असताना स्टेजवर अचानाक आग लागली आणि भडका उडाला. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. मात्र, ही आग लागताना गौतमीच्या बाॅऊन्सरने पाहीलं आणि त्यामुळे मोठा आनर्थ टळला. अचानक स्टेजवर आग लागल्याने काही वेळ कार्यक्रम थांबवण्यात आला.
गौतमीचा तरुणींना सल्ला-
अमरावतीमध्ये देखील बाहेरुन अनेक मुलं-मुली शिकायला येत असतात. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, असा प्रश्न गौतमी पाटीलला विचारण्याता आला. त्यावर गौतमी म्हणाली की, इथे बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगते की, स्वतःची काळजी घ्या. लढायचं असेल तर बिनधास्त लढा. मात्र कुणाच्या दबावाखाली राहू नका आणि आवर्जून नडा, असं गौतमी पाटील म्हणाली आहे
0 Comments