धाराशिवच्या परंडा शहरातील भूमी अभिलेख कार्यालय भाड्याच्या इमारतीत सुरु आहे. या इमारतीच्या भाड्यापोटी १० लाख रुपये थकले आहे. वारंवार मागणी करून देखील भाडे मिळत नसल्याने इमारत मालकाने भूमी अभिलेख कार्यालयास टाळे ठोकले आहे. कार्यालय बंद असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यासह शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.
धाराशिव जिल्ह्याच्या पारंडा शहरात असलेले भूमी अभिलेख कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे. सरकारी कार्यालय असून देखील इमारत मालकास वेळेवर भाडे दिले जात नाही. वेळोवेळी नोटीस देऊन देखील भाडे मिळत नाही. यामुळे इमारत मालक संतप्त झाला होता. या इमारत मालकाने यापूर्वी म्हणजे १२ ऑगष्टला टाळे लावले होते. त्यावेळी अधिकार्याने भाडे मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतू २२ दिवस झाले तरी भाडे मिळत नसल्याने इमारत मालक महावीर रोकडे यांनी आज पुन्हा टाळे लावले असून भाडे मिळाल्याशिवाय टाळे काढणार नाही; अशी भूमिका इमारत मालकाने घेतली आहे.
0 Comments