लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला, पण खडसेंचा भाजप प्रवेश अजूनही वेटिंगवरच आहे.
भाजप प्रवेशासाठी खडसे अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही दिल्लीत जाऊन भेट घेऊन आले, पण अजूनही खडसेंचा भाजपमधला प्रवेश झालेला नाही. यावरून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर घणाघाती टीका केली.
एकनाथ खडसे सरड्याप्रमाणे रंग बदलतात, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी केलेली ही टीका खडसेंच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर खडसे चांगलेत संतापले आहेत.
किती वेळा नवरे बदलले तू…- एकनाथ खडसे
चंद्रकांत पाटील यांच्याकडे नितीमत्ता आहे का? चंद्रकांत पाटील हा शिवसेनेचा अध्यक्ष होता, निवडणुकीमध्ये तो अपक्ष लढला त्यानंतर शरद पवारांच्या मदतीने निवडून आला. त्यानंतर तो उद्धव ठाकरेंकडे गेला, कालांतराने पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. किती वेळा नवरे बदलले तू आणि कुणाला बोलतो, असा पलटवार एकनाथ खडसेंनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या जीवावर आमदार झाला त्यानंतर उद्धव ठाकरेंकडे गेला. आता म्हणतो मी शिंदेंचा आहे, त्यामुळे सरड्यासारखे रंग तू बदलतो का मी बदलतो?, असा प्रत्युत्तर एकनाथ खडसेंनी दिलं आहे.
एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा
दरम्यान, भाजपमध्ये अजूनही वेटिंगवरच असलेल्या खडसेंनी लवकर निर्णय घ्या, नाहीतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काम करू, असा इशारा दिला
0 Comments