दुःखद ! मोहोळ शहरात महिला डॉक्टरने गळफास घेऊन संपवले जीवन


मोहोळ शहरातील महिला डॉक्टरने राहत्या घरी गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (दि.1) दुपारी 2 वाजता घडली. डॉ. रश्मी संतोष बिराजदार असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शंकर बिराजदार (रा. डॉ. आंबेडकर चौक, मोहोळ) हे मोहोळ येथे स्टेशनरी दुकान चालवतात. हा ठिकाणी त्यांची 3 मजली इमारत आहे. पहिल्या मजल्यावर मोहोळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असुन तेथेच दुसऱ्या मजल्यावर बिराजदार कुटुंबिय राहतात. रविवारी सकाळी साडेदहा वा.चे सुमारास दुकानामध्ये काम करण्यासाठी संतोष बिराजदार गेला होता. तो दुकानामध्ये काम करत असताना दूपारी दीड वा.चे सुमारास हॉस्पिटल मधील कर्मचारी सलीम मकानदार याने संतोष बिराजदार याला संपर्क करून मॅडम यांनी घरामध्ये गळफास घेतल्याची माहिती दिली.

यानंतर संतोष बिराजदार हा घरी तेव्हा पत्नी डॉ.रश्मी यांनी घरामध्ये छताचे पंख्याला साडीने गळफास घेतलेला दिसला.  याप्रकरणी संतोष बिराजदार याने मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments