‘मी कपडे बदलताना…’; अभिनेत्रीच्या गंभीर आरोपानं खळबळ


 मल्याळम चित्रपटसृष्टीत सध्या Me Too मोहिम सुरू आहे. यानंतर अनेक मल्याळम अभिनेत्रींनी समोर येत आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल सांगितलं आहे. आता प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

वॅनिटी वॅनमध्ये छुप्या कॅमेऱ्यांद्वारे अभिनेत्री कपडे बदलताना त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं जायचं, असा गंभीर आरोप या अभिनेत्रीने केला आहे. यानंतक एकच खळबळ माजली आहे. राधिका सरतकुमार यांनी एशियानेट न्यूज ‘नमस्ते केरळ’ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा करत गंभीर आरोप केले आहेत.

अभिनेत्रीच्या गंभीर आरोपानं खळबळ
हिंदी चित्रपटांमध्येही काम केलेली प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका सरतकुमार यांनी आणखी धक्कादायक दावा केला आहे. व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे लावण्यात आले होते, ज्याद्वारे रेकॉर्डिंग केले जात असल्याचं त्यांना समजलं. त्यांनी सांगितलं की, एकदा त्या केरळमध्ये काम करत होत्या, तेव्हा व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे बसवले असल्याचं त्यांना समजलं.

एकदा त्या केरळमध्ये एका प्रोजेक्टवर काम करत होत्या, तेव्हा त्यांना समजलं की, अभिनेत्री कपडे बदलताना रेकॉर्ड करण्यालाठी व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. क्रू मेंबर्सने व्हॅनिटी व्हॅनमध्ये कपडे बदलणाऱ्या महिलांच्या व्हिडीओ क्लिप्स रेकॉर्ड करुन आणि त्याचा डेटाबेसही ठेवला, असा दावा त्यांनी केला आहे.

 “व्हॅनिटी व्हॅनमध्ये कॅमेरे…”
मी केरळमध्ये सेटवर असताना मी पाहिलं की, लोक एकत्र जमले आहेत आणि काहीतरी पाहुन हसत आहेत. मी जवळून गेल्यावर मला दिसलं की, ते व्हिडीओ पाहत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

मला सांगण्यात आलं की व्हॅनिटी व्हॅनमध्ये कॅमेरे लावण्यात आले होते आणि त्यातून महिलांचे कपडे बदलतानाचे फुटेज घेण्यात आलं होतं. मला सांगण्यात आलं की तुम्ही फक्त कलाकारांचं नाव टाइप केल्यास तुम्हाला त्यांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ मिळतील, असंही धक्कादायक खुलासा त्यांनी केलाय.

Post a Comment

0 Comments