राज्यात अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक राज्यात निवडणुकीच्या तयारासाठी जागांची विभागणी, दौरे काण्यात व्यस्त आहेत. तसेच निवडणुका तोंडावर येताच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच आता भाजप नेते प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांवर केला पलटवार :
राज्यातील बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्यांवर मृत अक्षय शिंदे या नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली होती. मात्र या घटनेतील आरोपीचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला आहे. मात्र या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकाराला प्रचंड धारेवर धरले आहे. अशातच संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊतांनी सिंघम मुख्यमंत्री अशी त्यांची खिल्ली उडवत देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
मात्र हे सत्ताधारी भाजप नेत्यांना चांगलंच जिव्हारी लागलं आहे. आता भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये, अशा खरपूस शब्दांत भाजप नेते प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या ‘एक्स’ या सोशल मीडिया ट्विट करत संजय राऊत यांना सुनावलं आहे. राज्यातील स्वयंघोषित चघळून चोथा झालेल्या ‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये. कारण देवेंद्रजींबद्दल अग्रलेख लिहून टीका करणं म्हणजे उगवत्या सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे, मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की, ही थुंकी संजय राऊत यांच्याच तोंडावर पडली आहे.
तसेच ज्यांनी आयुष्यभर राजकारणात ‘चमचेगिरी‘ केली त्या संजय राऊत यांना धर्मवीर चित्रपटाची पटकथा काय कळणार? धर्मवीरची पटकथा लिहिणं आणि सामनाच्या अग्रलेखातून ‘चमचेगिरी‘ करणं यामध्ये खूप मोठा फरक असतो असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
0 Comments