सोलापूर ! पाखरे हुसकवण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकरी दाम्पत्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू..


विजेचा शॉक लागून एका शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातल्या दहिटणेत गावात घडली. अंबादास साळुंखे आणि कलावती साळुंखे असे मृत शेतकरी दाम्पत्याची नावे आहेत.

55555yyyyyyyyyy66y6666
B,,
मात्र, त्यांच्याही विजेच्या तारांना स्पर्श झाला. जवळ कुणीही नसल्याने दोघांचाही विजेच्या जोरदार धक्क्याने जागीच मृत्यू झाला. दरम्यान, साळुंखे दाम्पत्याच्या मृत्यूची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता.

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचा ठपका साळुंखे दाम्पत्याच्या नातेवाईकांनी ठेवला. त्यांनी दोघांचेही मृतदेह अक्कलकोट पोलीस ठाण्यात आणून ठेवले. याप्रकरणातील दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही. तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला.

अक्कलकोट पोलिसांनी त्यांची समजूत काढत महावितरण कंपनीविरोधात गुन्हा आणि मृत कुटुंबियांना महावितरणकडून आर्थिक मदतीचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर साळुंखे दाम्पत्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पती-पत्नीचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने अख्ख्या गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments