सोलापूर |
सोलापुरात मित्राच्या विधवा पत्नीवर अत्याचार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दीड महिन्यांपूर्वीच पीडितेच्या पतीचं निधन झालं होतं. सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बालाजी सत्यनारायण नल्ला असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याला वळसंग पोलिसांनी अटक केली आहे, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोलापुरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राच्या पत्नीवर घरात घुसून बलात्कार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पीडित महिलेच्या पतीचे दीड महिन्यांपूर्वीच निधन झालं आहे. वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित महिला ही विडी कामगार आहे.
0 Comments