क्रीडा व युवक संचालनालय पुणे, जिल्हा परिषद सोलापूर , जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर व महाराष्ट्र विद्यालय बार्शी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक २१ व २२ ऑगस्ट २०२४ वार बुधवार व गुरुवार रोजी १४,१७ व १९ वयोगटातील मुले व मुलींच्या शालेय तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये एकूण २४ संघातील मिळून सुमारे ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित महाराष्ट्र विद्यालय बार्शी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे व बार्शी तालुका क्रीडा समन्वयक संजय पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
१४ वर्षे मुलांच्या वयोगटात प्रथम क्रमांक प्राथमिक आश्रम शाळा खामगाव व द्वितीय क्रमांक महाराष्ट्र विद्यालय बार्शी. १७ वर्षे मुलांच्या वयोगटात प्रथम क्रमांक माध्यमिक आश्रम शाळा खामगाव व द्वितीय क्रमांक महाराष्ट्र विद्यालय बार्शी १९ वर्षे मुलांच्या वयोगटात प्रथम क्रमांक उच्च माध्यमिक आश्रम शाळा खामगाव आणि द्वितीय क्रमांक श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय बार्शी यांनी मिळवला. तर १४ वर्षे मुलींच्या गटात प्रथम क्रमांक महाराष्ट्र विद्यालय बार्शी व द्वितीय क्रमांक सुयश विद्यालय तांदुळवाडी. १७ वर्षे मुलींच्या गटात प्रथम क्रमांक फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शी व द्वितीय क्रमांक महाराष्ट्र विद्यालय बार्शी. १९ वर्षे मुलींच्या गटात प्रथम क्रमांक यशवंत विद्यालय खांडवी.
या स्पर्धेसाठी पंकज रणदिवे, पृथ्वीराज चव्हाण,क्षितीज लांडगे ,यश काळे ,प्रकाश गवळी, विश्वजीत देशमुख, शंतनू पाटील, मृणाल माने, सई डमरे व वैष्णवी शिराळकर, यांनी पंच म्हणून काम पाहिले. या स्पर्धेसाठी डॉ.सुरेश लांडगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी क्रीडा शिक्षक पी.डी.पाटील, योगेश उपळकर, शिवराज बारंगुळे व विकास पाटील यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ.बी.वाय. यादव,उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य श्री.ए.पी. देबडवार,संस्थेचे खजिनदार श्री.जयकुमार शितोळे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. व्ही.एस.पाटील,बी.के.भालके सर्व कार्यकारिणी सदस्य व सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे,उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक श्री.एस.सी.महामुनी,पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी.साठे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
0 Comments