Manu Bhaker ची ऐतिहासिक कामगिरी; कांस्य पदकावर कोरलं नाव



 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनु भाकरने नेमबाजीत कांस्य पदक मिळवलं आहे. यामुळे आता भारतात आनंदाचं वातावरण आहे. मनु भाकरने कांस्यपदक जिंकल्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने खातं उघडलं आहे.

मनु भाकरनं मिळवलं कांस्यपदक
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची  सुरूवात ही 27 जुलै रोजी झाली. हा दिवस भारतासाठी संमिश्र असा दिवस राहिला. काही लोकांनी पहिला सामना जिंकून चांगली सुरूवात केली. तसेच नेमबाज मनु भाकरचं विशेष कौतुक केलं जात आहे. कारण तिनं नेमबाजीत फायलनमध्ये स्थान मिळवलं. त्यानंतर मनुने यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिलं कांस्य पदक जिंकलं आहे.

तसेच टीम इंडियाचे खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी, बॅडमिंटन, रोईंग, टेबल टेनिस, आर्चरी, स्वीमिंग, बॉक्सिंग आणि टेनिस या खेळात कामगिरी करत आहेत. अशातच मनु भाकरने आज 28 जुलै रोजी आपला दावा आणखी मजबूत केला. 

मनु ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय नेमबाज ठरली आहे. तिनं 10 मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम सामन्यात 221.7 पॉइंट्ससह कांस्य पदक मिळवलं. मनु भाकरला रोप्य पदक मिळण्याची संधी होती, मात्र ती हुकली आणि मनुला कांस्य पदकावर समाधान मानवं लागलं आहे. 

विजयानंतर मनु भाकरची पहिली प्रतिक्रिया
मनु भाकरला कांस्य पदक मिळाल्याने देशात आनंदाचं वातावरण आहे. या विजयानंतर मनु भाकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी गीता वाचली आहे. आपल्या फोकसवर लक्ष केंद्रीत करा. अखेरच्या क्षणी माझ्या मनात हेच सुरू होतं, असं मनु भाकर म्हणाली होती.

Post a Comment

0 Comments