छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आंतरधर्मीय मुलासोबत लग्न केल्याचा राग मनात धरुन जावयाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत मुलीच्या वडिलांनी आणि चुलत भावाने मिळून तिच्या नवऱ्याची हत्या केली आहे.
राज्यातील जातीय समानता साधण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जातात. तसेच सरकारकडून आंतरजातीय विवाहासाठी आर्थिक मदत देखील जाहीर केली जाते. जेणेकरून समाजातील लोकांच्या मनात जातीविषयक द्वेष निर्माण होऊ नये. मात्र जातीव्यवस्था आजही मूळापर्यंत रुजल्याचे चित्र समाजात दिसून येते. त्यामुळे आतंरजातीय लग्न केल्यावर अनेक घटना केल्याच्या समोर येत आहेत. त्यातच एक संभाजीनगरमधुन ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. आंतरधर्मीय मुलासोबत लग्न केल्याचा राग मनात धरुन जावयाची हत्या केल्याची घटना घडली आहे. मुलीच्या चुलत भावाने आणि वडिलांनी मिळून जावयावर चाकूने गंभीर वार करत हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. इंदिरानगरमध्ये 14 जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित मुरलीधर साळुंके हा तरुण गंभीर जखमी झाला होता. शरीरावर खोलवर वार झाल्याने गुरुवारी घाटीच्या अतिदक्षता विभागात अमितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे
अमित आणि त्याची पत्नी हे दोघे बालपणीचे मित्रमैत्रीण होते. पण कालातंराने त्यांच्यामध्ये प्रेम झाले. मात्र, दोघांची जात वेगवेगळी असल्यामुळे घरातील मंडळींचा या प्रेमाला विरोध होता. पण घरच्यांचा विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले. त्यानंतर अमितच्या नातेवाईकांनी त्यांना स्विकारले, मात्र तिच्या घरात अद्यापही राग होताच. त्याच रागातून तिच्या वडील आणि चुलत भावाने अमितला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पळून जाऊन लग्न केल्याचा राग त्यांच्या डोक्यात फिरतच होता. यादरम्यान 14 जुलैला अमितवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्य़ंत उशीर झाला असून उपचारादरम्यान अमितचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी वडील गीताराम किर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब किर्तीशाही हे दोघेही सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. त्याचदरम्यान आता मुलाच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात ठिय्या केला आहे. तसेच जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही, तो पर्य़ंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
0 Comments