रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर मंजूर असून त्याचे काम सुरु करण्यासाठी या कामाचे जिओ टॅगिंग करणे आवश्यक असल्याचे यासाठी पंचायत समितीत आलेल्या शेतकऱ्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. दरम्यान वरिष्ठ साहेबांची १० हजार व स्वतःसाठी दीड हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
धाराशिव पंचायत समितीच्या आवारात हा प्रकार घडला असून या प्रकरणात पंचायत समिती मधील कंञाटी तांत्रिक सहायकाला एसीबीने रंगेहात पकडले आहे. प्रविण पार्श्वनाथ गडदे असे लाच स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदारांना रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर मंजुर आहे. तक्रारदाराला सदर विहीरीचे काम सुरु करायचे असल्याने त्या विहिरीचे काम चालू करण्यापुर्वी पंचायत समितीमधून जिओ टॅगिंग करणे अनिवार्य होते. यामुळे तक्रारदार पंचायत समिती कार्यलयात आले होते. याचे काम प्रवीण गडदे यांच्याकडे होते.
त्यानुसार तक्रारदार यांनी प्रवीण गडदे याची भेट घेतली असता तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. यात स्वत:साठी दीड हजार रुपये व साहेबांसाठी १० हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार दिली. यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून कर्मचाऱ्याला पैसे घेताना रंगेहाथ पकडले. यानंतर प्रवीण गडदे यास ताब्यात घेत आनंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments