सोनाली कुलकर्णीच्या बोल्ड फोटोने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ


अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'नटरंग' या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. आजही तिच्या 'अप्सरा आली' या गाण्याने चाहत्यांना वेड लावले आहे.

मनोरंजन विश्वात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे दिसते. 

अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने बोल्ड शेअर केले आहेत. यावरून तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे.

सोनालीने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोमध्ये सोनालीने लाल रंगाचा बॉडीसूट आणि त्यावर पांढऱ्या रंगाचं शर्ट घातले आहे. यात तीबोल्ड आणि हॉट दिसत आहे. 


तिच्या या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. काहींना तिचे हे फोटो पसंतीस पडले नाही. यावर एका चाहत्याने पोस्टच्या कमेंटमध्ये सोनालीवर टीका केली आहे.

 "तुम्ही महाराणी ताराबाई यांचा रोल प्ले करणार आहात, शोभत नाही तुम्हाला हे…" असे एका नेटकऱ्याने म्हंटले आहे. तर काहींना तिचे हे फोटो पसंतीस पडले आहे. दरम्यान, बोल्ड फोटोशूटमुळे सोनालीला याआधी देखील ट्रोल करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments