सोलापूर | बायकोला डोक्यात दगड घालून संपवल, मेव्हण्याला फोन करून बोलावलं; माहेरच्या येण्यापूर्वीच मृतदेह जाळला


सोलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील तेलगाव भीमा येथे पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने तेलगाव भीमा येथे खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. भाग्यश्री बसवराज कोळी असे हत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी फिर्यादी चंद्रकांत कोळी यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पती बसवराज आडव्याप्पा कोळी, शिवानंद आडव्यापा कोळी आणि गजानन आडव्यापा कोळी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बसवराज आणि भाग्यश्रीचा विवाह 2014 साली होता. त्यांना आदित्य आणि अमृता अशी दोन मुले होती. कोळी दामप्त्य हे निंबर्गी येथे शेती करून आपला उदरनिरर्वाह करत असे. शेतातच हे कुटुंब राहत होते. पती बसवराज हा शेतीबरोबरच गॅरेजमध्ये देखील काम करत असे. बसवराज ज्यावेळी गॅरेजमध्ये कामावरून घरी जाात असे त्यावेळी पत्नी कायम फोनवर बोलत असल्याने पतीला संशय आला. पतीने पाळत ठेवल्यानंतर पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पतीने तातडीने लोणी येथे जाऊन पत्नीच्या घरच्यांना हा प्रकार सांगितला. मात्र तिच्या वागण्यात बदल झाला नाही.

घरात झोपल्यानंतर बसवराजने पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या 

भाग्यश्रीला समज देण्यासाठी तिचा भाऊ आला. भावाने बहिणीला समज देत पतीला तिच्याकडचा मोबाईल काढून घे असे सांगितले. भावाने दाब दिल्यानंतर भाग्यश्रीने मोबाईल काढून दिला. त्यानंतर भांडण वगैरे करू नका असे सांगून भाऊ निघून गेला. रविवारी बसवराज व भाग्यश्री पती-पत्नी दोघे लोणीला मोबाईल आणण्यासाठी गेले. तिथेच जेवण करून दोघेही रात्री तेलगावला आले. घरात झोपल्यानंतर बसवराजने पत्नी भाग्यश्रीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. 

हत्येनंतर पत्नीच्या भावाला केला फोन

पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केल्यानंतर बसवराजने त्याचा भाऊ शिवानंद कोळी यांनी मेव्हण्याला फोन करून माझ्या भावाने तुझ्या बहिणचा खून केल्याचे सांगितले. तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते. भाग्यश्रीच्या भावाने आम्ही आल्याशिवाय अंत्यविधी करू नका असे सांगितले. मात्र बसवराज व त्याचे दोन्ही भाऊ यांनी अंथरुणासह मृतदेह उचलून नदीकाठी घेऊन गेले. तेथे लाकडावर ठेवून पेटवून दिले. दिवस उगवताना नदीकाठी गेलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह जळताना पाहिला. त्यानंतर गावात चर्चा सुरू झाली. तोपर्यंत भाग्यश्रीच्या घरचे आले आणि त्यांनी आक्रोश केला. 

पतीला अटक 

या खूनाचा प्रकार समजताच पोलीसांनी आरोपी पती बसवराज कोळी याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर त्यांने खुनाची कबुली दिली. दरम्यान खूनी व मृतदेह जाळण्यास मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मयत भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. याप्रकरणी चंद्रकांत गोविंद कोळी यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास एपीआय प्रशांत हुले करीत आहेत.

Post a Comment

0 Comments