बार्शी तालुक्यातील मुंगशी ( दहिटणे ) येथील मुंगशी विद्यालयास मनोज जरांगे पाटील यांचे नाव देण्याचा ठराव संस्थेचे अध्यक्ष डॉ कपिल कोरके यांच्या अध्यक्षते खाली मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंगशी विद्यालय या शाळेचे नाव यापुढे मनोज जरांगे पाटील विद्यालय, मुंगशी (दहिटणे) असणार आहे.
मुंगशी येथे १९९८ मध्ये जय जगदंबा शिक्षण संस्था सर्जापुरचे संस्थापक शिक्षणमहर्षी बाळासाहेब कोरके यांनी मुंगशी विद्यालयाची स्थापना केली. या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाणार आहे. सध्या विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग चालू आहे. या शाळेत मुंगशी, दहिटणे येथील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे दहावीच्या शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम आहे.
या विद्यालयाचे नाव बदलण्याचा ठराव संस्थेचे अध्यक्ष डॉ. कपिल कोरके यांनी मंजूर केला आहे. कोणत्याही समाजाला न दुखवता मनोज जारंगे पाटील यांनी जो मराठा समाजासाठी लढा दिला आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन ही कोरके यांनी केले आहे.
0 Comments