धाराशिव | पंधरा हजाराची लाच घेताना दोन पोलीस एसीबीच्या जाळ्यात



धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यात पोलीस आघाडीवर आहेत. एका इसमाच्या पत्नीच्या नावावर असलेला ट्रॅक्टर येरमाळा पोलिसांनी जप्त केला होता. हा जप्त केलेला ट्रॅक्टर सोडवण्यासाठी पंधरा हजार लाच घेताना एसीबी पथकाने दोन पोलिसाना रंगेहात पकडून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश नामदेव चाफेकर, पोलीस हवालदार पोलीस ठाणे, येरमाळा व  महेश जालिंदर सांगळे, वय-37 वर्षे, धंदा-नोकरी, पद -चालक पोलीस नाईक उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तुळजापूर . ( दोन्ही वर्ग 3). अशी या लाचखोर पोलिसांची नावे आहेत.

यातील तक्रारदार ( पुरुष, वय 42 वर्षे ) यांच्या पत्नीच्या नावे असलेला ट्रॅक्टर येरमाळा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यामध्ये जप्त असल्याने सदर ट्रॅक्टर सोडण्यासाठी लोकसेवक क्र. 01 यांनी लोकसेवक क्र. 2 यांच्या मार्फतीने तक्रारदार यांचेकडे 15000/- रुपये लाचेची मागणी करून लोकसेवक क्र. 2 याने 15000/-लाच रक्कम पंचांसमक्ष आज रोजी स्वीकारल्याने लोकसेवक क्र. 2 यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन तुळजापूर, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. हा सापळा पोलीस अंमलदार सचिन शेवाळे, विष्णू बेळे, नागेश शेरकर यांनी रचला होता.

Post a Comment

0 Comments