घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशाने उचललं मोठं पाऊल!


नताशा आणि टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्या यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. एकाबाजूला टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून हार्दिक पांड्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशातच पांड्याने काही दिवसांआधीच माझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे त्याचा माझ्या क्रिकेटवर कोणताही परिणाम होऊ देणार नसल्याचं पांड्या म्हणाला आहे. अशातच आता नताशा आणि हार्दिकच्या घटस्फोटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

नताशा आणि पांड्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते त्यांच्यावर बारीक लक्ष देऊन आहेत. आतापर्यंत मागील दोन आयपीएलमध्ये नताशाने पांड्याला चेअरअप केलं. तसेच यंदाच्या आयपीएल 2024 मध्ये नताशाने पांड्याला चेअरअप केलं नसल्याचं दिसलं. त्यामुळे नताशा आणि पांड्याच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं पाहायला मिळालं. 


तसेच सोशल मीडियावरही नताशा आणि पांड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियातून काढण्यात आले. त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. दोघे विभक्त होणार, घटस्फोटात नताशाला किती प्रॉपर्टी मिळणार याची मीडियामध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे. यावर आता दोघांनीही यावर मौन बाळगलं आहे. आता नताशाने पाऊल उचललं आहे. यावर सर्वच चाहत्यांनी आपलं लक्ष वेधलं आहे.

आता नताशाने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर पांड्याचे आणि नताशाने फोटो तसेच व्हिडीओ पुन्हा रिस्टोर करण्यात आले आहेत. यामध्ये वेलेंटाईनडेचे फोटो आहेत. नताशाच्या इन्स्टाग्रामवर हार्दिक पांड्याचे आणि नताशाचे फोटो पुन्हा एकदा दिसू लागले आहेत. आता या घटस्फोटांच्या चर्चांना पुन्हा एकदा पूर्णविराम मिळू शकतो. 

नताशाच्या या निर्णयामुळे या जोडप्याला मानणारे चाहते नक्कीच सुखावले असतील. पण तिने तिच्या सोशल मीडिया बायोमधून पांड्या हे सरनेम हटवलं होतं. फोटो का काढले? आणि पुन्हा रिस्टोर करण्याचं कारण काय? यामागील खरं कारण समोर आलं नाही.

सध्या हार्दिक पांड्या हा टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधार आहे. सध्या तो सरावासाठी घाम गाळताना दिसत आहे. पांड्या हा सध्या अमेरिकेत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून पांड्याला म्हणावी अशी कामगिरी करता आली नाही. त्याला प्रचंड ट्रोल आणि हूटिंग करण्यात आलं होतं.

Post a Comment

0 Comments