फडणवीसांना जोर का झटका! माढयात मोहिते पाटील विजयी


माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक खूपच रंजक पद्धतीने झाली. येथे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाशी बंडखोरी करत महाविकास आघाडीसोबत मैत्री केली. मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) माढ्याचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी ठरले.


आता माढा येथे धैर्यशील मोहिते पाटील यांनी 62 हजार मतांनी आघाडी घेतली. मोहिते पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा दारुण पराभव करतील असं महल जातंय.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय
माढा लोकसभा मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारण या मतदारसंघात मोहिते पाटील कुटुंबाने भाजपची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश करत ही निवडणूक लढवली आहे. भाजपने पुन्हा रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळं मोहिते पाटील नाराज होते. म्हणूनच त्यांनी बंडखोरी करत शरद पवारांशी हाथ मिळवला होता.

रणजितसिंह निंबाळकर यांचा पराभव

या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारासाठी  खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली होती. तर महाविकास आघाडीकडून देखील शरद पवार यांनी मोहिते पाटील यांच्यासाठी सभा घेतली होती. मात्र, भाजपचे सर्व प्रयत्न येथे फोल ठरले आहेत. शरद पवारांच्या शिलेदाराने येथे विजयी आघाडी घेतली आहे. फक्त विजयावर मोहोर लावणं अद्याप बाकी आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत मोहिते पाटील यांना आता पासूनच शुभेच्छा दिल्या आहेत. माढा मतदारसंघात दडपशाहीला झुगारून धैर्यशील मोहिते पाटील यांचा दणदणीत विजय! असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

Post a Comment

0 Comments