येत्या विधानसभा निवडणुकीत मंत्री तानाजी सावंत यांना धोक्याची घंटा?


राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या तानाजी सावंत यांच्या  मतदारसंघात मोठा लीड घेऊन शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर विजयी झाले आहेत.

निवडणूक प्रचारात तानाजी सावंत यांनी ओमराजेंविरुद्ध प्रचार करत त्यांच्यावर जबरी टीकाही केली होती. तर, धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 5 आमदार महायुतीचे असतानाही राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य ओमराजे निंबाळकर  यांना मिळालं आहे. त्यामुळे, साहजिक राज्यभर त्यांच्या विजयाची चर्चा होत आहे. मात्र, शिंदे सरकारमधील नेते आणि मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातही निंबाळकर यांना मोठं मताधिक्य मिळालं आहे.

तानाजी सावंत यांच्या भूम-परंडा-वाशी मतदारसंघातून ओमराजे यांना सर्वाधिक 81 हजारांचा लीड आहे. त्यामुळे, तानाजी सावंत यांच्यासाठी पुढील विधानसभा निवडणुकीत धोक्याची घंटा असल्याचे दिसून येते.

Post a Comment

0 Comments