“मी त्याचा फोन उचलला नाही की तो मला शारीरिक…”,ऐश्वर्या रायने केला खुलासा

 बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेचा विषय बनत असते. ऐश्वर्या तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चाहत्यांना घायाळ करत असते. आपल्या प्रोफेशनल लाईफ बरोबरच ऐश्वर्या तिच्या पर्सनल लाईफमुळे सतत चर्चेत राहते. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न होण्याधी ऐश्वर्याचं नाव सलमानसोबत जोडलेलं होतं.

या दोघांच्या नात्याची देखील तूफान चर्चा होती. मात्र, सतत होत असलेल्या वादांमुळे ऐश्वर्या आणि सलमान यांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला. एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्याने याचा खुलासा केला आहे.

मी कामावर  असं जायचे जसं काही घडलंच नाही. जेव्हा मी सलमान खानचे फोन उचलण्याचं बंद केलं तेव्हा सलमानने मला मारहाण करायला सुरुवात केली आणि शारीरिक दुखापत केली. आणि म्हणूनच मी कोणत्याही स्वाभिमानी स्त्रीप्रमाणे त्याच्यासोबतचे सगळे संबध तोडले. आमचं नातं याचमुळे तुटलं, असं तिने सांगितलं.

मुलाखतीमध्ये बोलत असताना ऐश्वर्या म्हणाली की, सलमान मला मारहाण करायचा शिवाय तो शिवीगाळ देखील करायचा. पुढे ती म्हणाली की, सलमान दारु पिऊन धिंगाणा घालायचा. एवढंच नव्हेतर तिचा त्याने अनेकदा अपमानही केला. काही दिवसांपुर्वी सलमानने दिलेल्या मुलाखतीत हे सगळे आरोप फेटाळून लावले होते.

Post a Comment

0 Comments