‘पंकजा मुंडेंना कॅबिनेटमंत्री करा’; बीडमध्ये झळकले बॅनर्स


भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. यामुळे हा पराभव भाजप आणि पंकजा मुंडे यांच्या जिव्हारी लागला. अशातच आता आज तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होणार आहेत. नरेंद्र मोदींसोबत इतर 46 खासदार याचा शपथविधी होणार आहे. अशातच आता बीड येथे पंकजा मुंडे यांना कॅबिनेटमंत्री पद देण्याबाबत बॅनरबाजी करण्यात आली आहे. 

“पंकजा मुंडेंना कॅबिनेटमंत्री पद द्या”, बॅनरबाजीने लक्ष वेधलं
बीडमध्ये पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे आता बीडमधील कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावं, अशी मागणी केली आहे. पंकजा मुंडेंचे समर्थक गणेश लांडे याने ही बॅनरबाजी केली आहे. या बॅनरची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे विरूद्ध बजरंग सोनवणे यांच्यात लढत झाली होती. या लढतीत बजरंग सोनवणे यांनी 6 हजार मतांनी विजय मिळवला. यामुळे हा पराभव पंकजा मुंडे आणि भाजपच्या जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र त्यानंतर एक मोठी धक्कादायक घटना घडली होती. एका युवकाने पंकजा मुंडेंबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यामुळे बीडमधील वातावरण आणखी तापलं होतं. 

बीडमध्ये वातावरण तापलं असताना एका कार्यकर्त्यांने बीडमध्ये पंकजा ताईंची कॅबिनेटपदासाठी निवड करा, अशी बॅनरबाजी केली आहे. सध्या बीडमध्ये बंद पुकारण्यात आला होता. आता शिरूरमध्ये बंदीची हाक आहे. त्यानंतर आज परळीमध्ये देखील तिच परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासनही अलर्ट मोडवर आहे.

मोदींसह 46 खासदारांचा शपथविधी
आज नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 46 खासदार आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद दिलं आहे. तर दुसरीकडे भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना मंत्रीपद दिलं आहे. दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणेंचा मंत्रीपदावरून पत्ता कट करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भागवत कराड यांना देखील संधी दिली गेली नाही.

Post a Comment

0 Comments