Amit Shah : अमित शहांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले; काँग्रेसच्या आरोपाची आयोगाकडून दखल


नवी दिल्ली |

देशात लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा 1 जून रोजी पार पडला. तर, 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत मोठा दावा केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप यांनी गंभीर आरोप केला आहे. अमित शहा हे जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत असल्याचा गंभीर आरोप सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. 

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरोप केला आहे की, गृहमंत्री अमित शाह यांनी मतमोजणीआधी 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन धमकावले. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केलेल्या सार्वजनिक वक्तव्याबाबत वस्तुस्थिती आणि तपशील मागितला. त्याच्या आरोपाची निवडणूक आयोगाने दखल घेतली असून त्यांना याबाबत माहिती देण्यास सांगितले आहे. पुढील कारवाईसाठी निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे 2 जूनच्या संध्याकाळपर्यंत उत्तर मागितले आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले होते की, “गृहमंत्री आज (ता. 1 जून) सकाळपासून जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर बोलत आहेत. आतापर्यंत 150 अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. अधिकाऱ्यांना उघडपणे धमकावण्याचा हा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे. लक्षात ठेवा लोकशाही धमक्यांवर नव्हे तर आदेशावर चालते. 4 जूनच्या जनादेशानुसार नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप सत्तेतून बाहेर पडतील आणि भारताचा विजय होईल. अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता संविधानाचे पालन केले पाहिजे. त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली आहे,”

Post a Comment

0 Comments