Patanjali : पतंजली पुन्हा वादात; गुणवत्तेच्या निकषात सोनपापडी फेल


बाबा रामदेव आणि पतंजली पुन्हा वादात सापडले आहेत. पतंजली सोनपापडीने गुणवत्ता निकष पूर्ण न केल्याने उत्तराखंड मधील पिथौरागड येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी कंपनीच्या एका सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

 न्यायालयाने रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीला धारेवर धरले होते. तेव्हापासून त्यांच्या अडचणी वाढतानाच दिसत आहेत. या जाहिरातीवरून न्यायालयाने रामदेव बाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक गोष्टी सुनावल्या. त्यानंतर आता बाबा रामदेव आणि पतंजली पुन्हा वादात सापडले आहेत. पतंजली सोनपापडीने गुणवत्ता निकष पूर्ण न केल्याने उत्तराखंड मधील पिथौरागड येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी कंपनीच्या एका सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या सोबतच तिघांना दंड देखील ठोठावण्यात आला आहे. 

ही घटना चार, साडे चार वर्षांपूर्वीची आहे. 17 अक्टूबर, 2019 रोजी एका खाद्य सुरक्षा निरीक्षकांनी पिथौरागड मधील बेरीनागच्या मुख्य मार्केटमधील लीलाधर पाठक यांच्या दुकानात ठेवण्यात आलेल्या पतंजलीच्या सोनपापडीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे सोनपापडीचे नमुने घेत वितरकासह पतंजली आयुर्वेद लिमिटेडला नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर उत्तराखंडमधील रुद्रपूर, उधम सिंह नगरमधील राज्य खाद्य आणि औषध परीक्षण प्रयोगशाळेत याची फोरेन्सिक चाचणी करण्यात आली. डिसेंबर 2020 मध्ये याचा अहवाल मिळाला. त्यानुसार, ही मिठाई निकृष्ट दर्जाची असल्याचे म्हटले होते. त्यानंतर लीलाधर पाठक, वितरक अजय जोशी आणि पतंजलीचे सहव्यवस्थापक अभिषेक कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

खाद्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयात सादर केलेले पुरावे हे स्पष्टपणे ही मिठाई निकृष्ट असल्याचे सांगत होते. त्यामुळेच सुनावणीनंतर न्यायालयाने खाद्य सुरक्षा आणि गुणवत्ता अधिनियम 2006 नुसार कलम 59 अंतर्गत या तिघांनाही सहा महिने तुरुंगवास आणि पाच, दहा आणि पंचवीस हजारांचा दंड ठोठावला आहे.

Post a Comment

0 Comments