पुणे |
तब्बल ११ वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ च्या सकाळी ७.१५ च्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी अगदी जवळून त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. यातील एक गोळी डॉ. दाभोलकरांच्या छातीत, तर दुसरी डोक्यात लागली होती. दाभोलकरांच्या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती.
0 Comments