निवडणूक संपताच महागाई वाढणार! तुमच्या मोबाईलचं बिल महागणार!


मुंबई |

मोबाईल फोनचे रिचार्ज महागणार, निवडणुकीनंतर मोबाईल बिल महागण्याची शक्यता, २०१९ ते २०२३ या कालावधीत कंपन्यांनी तीन वेळा शुल्क वाढवला. सध्या चालू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मोबाईल बिल महागण्याची शक्यता असून टेलिकॉम कंपन्यांकडून मोबाईल रिचार्जच्या दरवाढीची पूर्ण तयारी करण्यात आहे. होय, निवडणुकीनंतर सर्वसामान्यांना फोनचा रिचार्ज महागणार आहे .

फोनचे रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ होणार असल्याने आता फोनवर बोलणे महागात पडेल. फोन वापरकर्त्यांसाठी एकूण चौथ्यांदा रिचार्ज प्लॅनच्या बाबतीतला हा मोठा धक्का लवकरच बसणार असून सुमारे २५ टक्क्यांनी बिल वाढण्याची शक्यता आहे.

 वायरलेस पॅकच्या किमतीत वाढ झाल्याचा सर्वाधिक फायदा भारती एअरटेल आणि जिओ कंपनीला होईल. 
जोपर्यंत त्यांना हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी मिळत राहते तोपर्यंत ग्राहक दूरसंचार सेवांसाठी पैसे देण्यास तयार असतील असे त्यांनी म्हटले.

Post a Comment

0 Comments