धाराशिव |
धाराशिव लोकसभा मतदारसंघात येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात महायुतीचा प्रचार जोमात सुरू आहे आमदार राणा जगजितसिंह हा मितभाषी माणूस आहे. हा बोलतो कमी अन् काम जास्त करतो.
तर दुसरीकडे ओमराजेंबद्दल बोलायलाच नको. ते बोलतात जास्त अन् बापाच्या जीवावर मतं मागतात. अशा माणसांमुळे आपली प्रगती होणार नाही, अशी टीका रासप नेते महादेव जानकर यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली. धाराशिव येथील लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत जानकर बोलत होते.
जानकर म्हणाले, मी महायुतीचा आभारी आहे की त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) एक जागा दिली. त्यामुळे मी आता चांगल्या मताधिक्याने निवडून येईल, अशी मला खात्री आहे. ही लढाई नरेंद्र मोदी की राहूल गांधी अशी आहे असे बोललं जात आहे. पण नक्की पंतप्रधान राहूल गांधी होणार की आणखी कोणी? हे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना देखील माहीत नाही. तेव्हा धाराशीवच्या पाचवीला पूजलेला दुष्काळ घालवायचा असेल तर, महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मतं द्या, विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा,असे आवाहन महादेव जानकर यांनी मतदारांना केले.
0 Comments