नितिन गडकरींना पाडण्यासाठी मोदी - शहांची फिंल्डींग!मुंबई |

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना लोकसभेत पाडण्यासाठी केंद्रातून नरेंद्र मोदी आणि अमित शहा प्रयत्नशील आहेत. तसेच राज्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींच्या पराभवाची रसद घेतल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून केला.

संजय राऊतांच्या या आरोपांवर राजकारणातून तसेच महायुतीच्या नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी संजय राऊतांच्या या दाव्यावर जोरदार टीका केली. तर अंबादास दानवे यांनी संजय राऊत यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.

Post a Comment

0 Comments