बॉलिवूड सिनेविश्वाची अभिनेत्री सारा अली खान ही सोशल मीडियावर कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. न केवळ प्रोफेशनल तर पर्सनल कारणांमुळे सुद्धा सारा चर्चेचा विषय बनते. सारा अली खान आज बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो तिच्याबाबत जाणून घेण्यासाठी कायम उत्सुक असतो. अशातच सारा अली खानच्या लग्नासंदर्भात अनेक चर्चा सुरु आहेत. असे म्हटले जात आहे की, सारा अली खान या वर्षभरात लग्न करणार आहे. त्यामुळे आता सारा कुणासोबत लग्नगाठ बांधणार याविषयी सगळ्यांना उत्सुकता वाटते आहे.
सध्या सारा अली खानच्या लग्नाबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. असे सांगितले जात आहे की, अभिनेत्री सारा अली खान या वर्षात लग्न करू शकते. सोशल मीडियावर तशा बऱ्याच पोस्ट व्हायरल होत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीच्या लग्नासंदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते आहे. ज्यामध्ये सारा अली खानचा साखरपुडा झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे साराचे चाहते तिच्या आयुष्यात येणारा ‘तो’ नेमका आहे तरी कोण? याबाबत जाणून घेण्यासाठी फार उत्सुक झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टवर, सारा अली खानचा एका श्रीमंत उद्योगपतीसोबत साखरपुडा झाला आहे. रेडिटवर ही पोस्ट व्हायरल होते आहे. ज्यामध्ये म्हटलंय, ‘मी याआधीही सांगितलं आहे. त्यावेळी माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. पण साराचा साखरपुडा पार पडला आहे आणि दोन वर्षाच्या आत ती लग्नबंधनात अडकणार आहे. सारा अली खान लवकरच ”मेट्रो इन दिनो” या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करणार आहे. साराने कोणताही नवा चित्रपट साइन केलेला नाही. त्यामुळे आता या सिनेमाच्या शुटिंगनंतर ती लग्नाच्या तयारीला सुरुवात करेल’
0 Comments