धाराशिव |
महाविकास आघाडीचा उमेदवार सध्या खोटं बोलून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे. त्यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही. त्यामुळे लोकांनी त्यांच्या भूलथापांना बळी न पडता, मोदीविरोधी भूमिका असलेल्या विरोधी उमेदवाराला त्याची जागा दाखवून द्या, असे आवाहन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी केले.
पुढे बोलताना धनंजय सावंत म्हणाले की, विरोधकांनी आजपर्यंत कोणती कामे केली? त्याचा हिशोब नागरिकांसमोर मांडला पाहिजे. केवळ खोट्या बाता करून लोकांसमोर संभ्रम निर्माण करणे बंद करावे. जे बोलायचे असेल पुराव्यांनिशी बोलावे. महायुती सरकार हे कामातून बोलणारे सरकार आहे. त्यामुळे नागरिकांना केवळ विकास आणि काम पाहिजे. ही निवडणूक कुठल्याही दोन पक्षांमधील निवडणूक नाही तर देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. यामध्ये प्रत्येक मताला फार महत्त्व आहे.
केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. निधीचा ओघ आपल्याकडे वळविण्यासाठी निवडून येणारा खासदार हा आपल्या हक्काचा असणे गरजेचे आहे. तेव्हाच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. म्हणूनच येत्या निवडणुकांमध्ये घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन धनंजय सावंत यांनी केले.
0 Comments