पुणे |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदूरबार येथील जाहीर सभेतून शरद पवारांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली. आमच्यासोबत आले तर तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील असेही पंतप्रधान म्हणाले. मोदींच्या ऑफरवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी आणि भाजप जनमत गमावत आहे. जनमत त्यांच्या विरोधात आहे. त्या अस्वस्थतेतून ते बोलत आहेत. आम्ही ज्या विचारधारेत वाढलो ती विचारधारा सोडून बाहेर जाणार नाही. असे म्हणत त्यांनी मोदींची ऑफर नाकारली आहे. दुपारी 1.30 वाजता त्यांची पुणे लोकसभेतील काँग्रेस- महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापूर्वी शरद पवार हे पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्र्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदींची अलिकडील सर्व भाषणे ही समाजा समाजामध्ये गैरविश्वास निर्माण करणारी आहे. त्यांच भाषणे ही देशाला घातक आहे. देश एकसंध राहावा या विचारांच्या बाजूने आम्ही आहोत. जे समाजाला घातक आहे तिथे आमचे सहकारी असणार नाही. मोदींच्या विचारांविरोधात जनमत व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेतूनच ते असं विधान करत असल्याचे शरद पवार म्हणाले.
मोदींच्या ऑफरवर पवार म्हणाले की, गांधी-नेहरुंची विचारधारा ही सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारी आहे. हा देश एकसंध ठेवायचा आहे. सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जावे लागणार आहे. जो देशाचे नेतृत्व करतो त्याने एका जातीचं, धर्माचा विचार करणं धोकादायक आहे. मग ते पंतप्रधान असतील किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री त्यांचे विचार हे देशाला धोकादायक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हटले आहे, या प्रश्नावर पवार म्हणाल की, त्यांना शिवसेनेला नकली शिवसेना म्हणण्याचा अधिकार कोणी दिला. पंतप्रधान पद हे एक संविधानिक पद आहे, त्या संविधानिक पदाचा सन्मान नरेंद्र मोदी राखत आहेत असे आम्हाला कुठेही वाटत नाही, असाही टोला त्यांनी नरेंद्र मोदींना लगावला.
एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण काढून मुस्लिमांना दिले जाईल असे विधान नरेंद्र मोदींनी केले आहे. तर दुसरीकडे ते म्हणाले की एससी, एसटीचे आरक्षण वाढवले जाईल, यावर शरद पवार म्हणाले की
आरक्षण वाढवायचे असेल तर आमचा काही विरोध नाही. मात्र एका धर्माच्या, जातीच्या विरोधात पंतप्रधानांनी बोलणं देशासाठी घातक आहे. ते पंतप्रधानंच्या प्रतिष्ठेला शोभणारं नाही.
0 Comments