सोलापूर | ऑम्लेट करून देण्याचा बहाणा, वृद्धाने केला विवाहितेचा विनयभंग



मंगळवेढा |

मंगळवेढा शेजारी राहणाऱ्या एका २६ वर्षीय विवाहित तरुणीला ऑम्लेट करून देण्याचा बहाणा करीत घरी बोलावून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी बापू रामचंद्र पवार (वय ६०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी तथा पीडित विवाहितेचे पती बाहेरगावी सेंट्रिंग कामासाठी दि.१ मे रोजी सकाळी ८ वाजता गेल्याने पीडिता व दोन लहान मुलांसह ती एकटीच घरी होती. यावेळी आरोपीची पत्नी व मुलगा हे दोघे लग्नकार्यासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून दुपारी १.३० वाजता आरोपीने पीडितेस ऑम्लेट करण्याकरिता घरी बोलावून घेतले.

यावेळी पीडितेने माझ्याकडे दोडक्याची भाजी केली आहे, ती देते असे म्हणाल्यावर आरोपीने जवळ येऊन पीडितेच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करताच पीडिता ही तत्काळ घरी निघून गेली. यावेळी पीडितेने माझ्याकडे दोडक्याची भाजी केली आहे, ती देते असे म्हणाल्यावर आरोपीने जवळ येऊन पीडितेच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करताच पीडिता ही तत्काळ घरी निघून गेली.

आरोपीने पाठीमागे तिच्या घरी येऊन आपल्या दोघात जो प्रकार घडला तो कोणाला सांगू नको, आपल्या दोघांमध्येच राहू दे, असे म्हणाला. या वेळी पीडितेने मी तुझ्याविरुद्ध तक्रार देणार आहे, असे म्हणताच आरोपीने पीडितेस जातिवाचक शिवीगाळ करून तू जर माझ्या विरुद्ध तक्रार दिली. तर जिवे मारीन, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत पीडितेने म्हटले आहे. दरम्यान, घडल्या प्रकारामुळे पीडिता घाबरून गेल्यामुळे तिने दि. ४ मे रोजी सकाळी १० वाजता आईस घडला प्रकार सांगितला. या घटनेचा अधिक तपास डी. वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड हे करीत असून, त्यांनी रविवारी सकाळी घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन घटनेबाबत माहिती जाणून घेतली.

Post a Comment

0 Comments