सिरसाव |
श्री ज्योतिर्लिंग व काळभैरवनाथ यात्रेची औचित्य साधून महालक्ष्मी मैदान सिरसाव येथे भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन ९ मे रोजी गुरुवारी करण्यात आले आहे. सिरसाव येथे तब्बल दहा ते पंधरा वर्षांनी भव्य असे कुस्त्याचे मैदान होणार असल्याने पैलवानासह ग्रामस्थांमध्ये उत्साह पहावयास मिळत आहे.
या भव्य मैदानामध्ये ५१ हजार रुपये रोख व व गदा यासाठी पै. मनोज माने, आगळगाव व व पै. किरण मांडवे, भैरवनाथ तालीम सोनारी यांच्यामध्ये लढत होणार आहे. याशिवाय या कुस्ती स्पर्धेमध्ये अनेक नामांकित मल्लांच्या कुस्त्या देखील संपन्न होणार आहेत. त्यामुळे सिरसाव येते कुस्तीप्रेमींचा जनसागर उसळणार हे नक्की आहे.
गेल्या तीन-चार वर्षापासून सिरसाव येथे पै.वस्ताद शहाजी राऊत व पै. तानाजी बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने पैलवान परिश्रम करत आहेत. न भूतो न भविष्य ठरणार्या कुस्तीच्या महाकुंभाचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने यावे असे आवाहनही आयोजकांकडून त्यांनी केले आहे.
0 Comments