मोदींचं माझ्यावर प्रेम उतू आलंय, उद्धव ठाकरे यांचा मोदींना जोरदार टोला


मुंबई |

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा आजारी होते मी नियमितपणे रश्मी ठाकरे यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायचे. उद्धव ठाकरे यांनी शस्त्रक्रिया करण्याबाबत माझ्याकडून सल्ला घेतला, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.

मात्र राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याचपार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर टीकास्त्र सोडले आहेत. ते आज महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ धाराशिव येथील सभेला संबोधित करत होते. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी इथे आलोय ते ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्या निष्ठेवरती, त्यांच्या कामाच्या जोरावर तुम्हाला भेटायला. मी मत मागायला आलो नाही, मी इथे जुगाड लावायला आलो नाही, मी इथे तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. जनतेनं हातात घेतलेली ही निवडणूक आहे. निवडणूक आयोगाचे कॅमेरे इथे फिरत असतात.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदींना माझ्यावर प्रेम उतू आलंय. मोदींनी काल परवा एक मुलाखत दिली. अनेकांनी मला मेसेज केले मोदींचं तुमच्यावर प्रेम आहे. मोदी तुम्ही येवढ्या प्रेमाने माझी चौकशी करत होते. मी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा ते माझी विचारपूस करायचे. मी जास्त खोलात जात नाही. पण हे खरे असेल तर पुरावा कोण कुणाला देणार? तुम्ही माझी अस्थेवाईक विचारपूस करत होता तर खालच्या लोकांना माहीत नव्हतं का? तुमच्या खालची माणसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे गाठीभेटी घेत होते. तेव्हा तुम्हाला माहीत नाही की हे काय करत होते. एकनाथ खडसे यांचा फोन आला होता. युती तोडण्याचे वरून आदेश होते. हे तुम्हाला माहित नव्हते का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

Post a Comment

0 Comments