शरद पवारांना सर्वात मोठा धक्का बसणार?


 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट  लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असं माजी कृषीमंत्री शरद पवार म्हणाले होते. मात्र अशातच आता राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी यावर भाष्य केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून काही आमदार सोनिया गांधी यांची भेट घेत असल्याने असं कधीही होऊ शकतं असं सुनील तटकरे म्हणाले आहेत. पत्रकारांच्या अनौपचारिक चर्चेत बोलत असताना त्यांनी वक्तव्य केलं आहे.

सुनील तटकरेंचा धक्कादायक दावा
सुनील तटकरे यांनी केलेल्या दाव्यावर आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. अनौपचारिक बैठकीत सुनील तटकरे यांनी सांगितलं की, मागील काही दिवसांपासून आमदारांकडून सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही भेट कोणत्याही क्षणी होऊ शकते, असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे. 

शरद पवार गटातील ‘हे’ नेते काँग्रेसमध्ये जाऊ शकतात

सुनील तटकरे यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या चर्चेत काही महत्त्वाचे पदाधिकारी असल्याचं समजतंय. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील धीरज शर्मा आणि सोनिया दुहान हे सोनिया गांधींसोबत जाऊ शकतात अशी चर्चा आहे.

मात्र कोणते आमदार हे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील याबाबत सुनील तटकरे यांनी कोणतीही माहिती दिली नाही. मात्र पाच ते सहा आमदार हे दिल्लीला सदैव भेटायला जात असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. तटकरेंनी त्यांची नावं सांगितली नाहीत.

दरम्यान, काही दिवसांआधी धीरज शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रीय पदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे सोनिया दुहान या देखील राष्ट्रवादी काँंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर नाराज आहेत. सुप्रिया सुळे यांच्यामुळे काही नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनातील सल बोलून दाखवली. तसेच सुप्रिया सुळे या कधीच आमच्या नेत्या होऊ शकल्या नसल्याचं सोनिया दुहान यांनी म्हणाल्या.

Post a Comment

0 Comments