‘मी माझ्या बॉयफ्रेंडचा फोन…’; जान्हवी कपूरचा मोठा खुलासा


अभिनेत्री जान्हवी कपूर ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची कन्या आहे. जान्हवी तिच्या चित्रपटांना घेऊन नेहमी चर्चेत असते. तिच्या मिस्टर अँड मिसेस माही सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. अशातच ती आता ठिकठिकाणी मुलाखती देत आहे. आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. यावेळी एका मुलाखतीत बोलत असताना तिने आपला बॉयफ्रेंड सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहारिया बद्दल स्पष्टच बोलली.

जान्हवीच्या गळ्यात शिखु नावाचं लॉकेटसुद्धा पाहायला मिळालं होतं. आता एका मुलाखतीत जान्हवीने तिच्या बॉयफ्रेंडविषयी एक मोठा खुलासा केला होता. या मुलाखतीत बोलत असताना जान्हवीने सांगितलं की मी माझ्या बॉयफ्रेंडचा फोन तपासते. 

“जान्हवी तिच्या बॉयफ्रेंडचा फोन चेक करते”
‘झी’ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने याची कबुली दिली की ती तिच्या बॉयफ्रेंडचा फोन चेक करते. “मला माहिती आहे की हे सर्वकाही चुकीचं आहे तरीही मी पार्टनरचा फोन सतत तपासत असते”, असं जान्हवी म्हणाली आहे.

जान्हवीचा सपोर्ट सिस्टम कोण?
एका मुलाखतीत जान्हवीला तिचा सपोर्ट सिस्टम कोण? असा सवाल केला. तेव्हा तिनं शिखरचं नाव घेतलं आहे. “मी 15 वर्षांची असल्यापासून तो माझ्या आयुष्यात आहे. माझ्या मते माझी स्वप्न ही नेहमीच माझी स्वप्न राहिली आहे. आम्ही एकमेकांच्या खूपच जवळ आहोत. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. आम्ही एकमेकांनाच लहानाचं मोठं केलं आहे. आम्ही एकमेकांना साथ देत असतो”, असं जान्हवी कपूर म्हणाली आहे.

शिखर पहारिया हा स्मृती शिंदे यांचा मुलगा आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. स्मृती शिंदे या सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे. यामुळे दोघेही शाळेपासून एकमेकांना ओळखतात.

करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये जान्हवी आली होती. तेव्हा तिने शिखरच्या आणि तिच्या नातेसंबंधांवर पहिल्यांदा भाष्य केलं होतं.

Post a Comment

0 Comments