प्रणिती शिंदेंना मतदान केले ; राष्ट्रवादी सोशल मीडियाचा जिल्हाध्यक्षाची तडकाफडकी हकालपट्टी


सोलापूर |

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी चुरशीने मतदान होत आहे. असे असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोशल मीडियातील फोटोग्राफर सेलच्या जिल्हाध्यक्षला काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना मतदान केल्या प्रकरणी तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

यश बनकर असे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे नाव असून राष्ट्रवादी सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष बापू पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

यश बनकर यांनी लोकसभा निवडणुकीत आपले पहिल्यांदाच मतदान करताना सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मतदान केले. त्याबाबतचे स्टेटस आणि फेसबुकला त्यांनी फोटो टाकला यावरून त्यांच्यावरही कारवाई झाली आहे.

Post a Comment

0 Comments