फडणवीसाच्या विठ्ठल कारखान्यावरील सभेला आजी माजी आमदाराची दांडी


पंढरपूर |

माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन केले होते.

या माढा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक तथा माजी आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूर-मंगळेवढ्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान अवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे हे अनुपस्थित होते. त्यामुळे अभिजित पाटील यांच्या एन्ट्रीमुळे पंढरपूरमधील हे तीन नेते नाराज झाली की काय, अशी चर्चा आता पंढरपूर-मंगळवेढ्यात रंगली आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर 26 एप्रिल रोजी राज्य सहकारी बँकेने थकीत कर्जप्रकरणावरून जप्तीची कारवाई केली. कारखान्याची तीन गोदामे सील केली होती. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले होते. मात्र, जप्तीची कारवाई झाली, त्या दिवशी रात्री अभिजित पाटील यांनी कारखान्याचे संचालक आणि विश्वासू सहकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. त्या बैठकीत अभिजित पाटील यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले.

Post a Comment

0 Comments