बेडरूममध्ये मुलासह मला वडिलांनी पकडलं;... जान्हवी कपूरचा धक्कादायक खुलासा


दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची मुलगी आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सध्याच्या काही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी ही आपल्या स्टायलिश फोटोंनी सोशल मीडियावर कायमच सक्रिय राहत असते.

तिच्या अनेक फोटोला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. लवकरच ती 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात दिसणार आहे आणि याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे.

या प्रसंगाबद्दल जान्हवीने असं म्हटलं की, "आम्ही आमच्या जुन्या घरात राहत होतो. तेव्हा मी एकदा माझ्या एका मित्राला माझ्या घरी बोलावले होते. त्यावेळी घरी कोणी नव्हते आणि आम्ही दोघे बेडरूममध्ये बोलत होतो. पण तेवढ्यात वडील घरात आले आणि घाबरून मी मुलाला दरवाजाऐवजी खिडकीतून खाली उडी मारायला लावली".

यापुढे जान्हवीने असं म्हटलं की, "मला वाटले की जर तो खिडकीतून पळून जाईल तर वडिलांना याचा सुगावाही लागणार नाही. पण वडिलांनी सर्व काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिलं आणि माझा प्लॅन फसला. याची शिक्षा म्हणून माझ्या वडिलांनी घरच्या सर्व खिडक्यांना ग्रील लावले".

दरम्यान, जान्हवीने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेकदा भाष्य केले आहे. आईच्या निधनानंतर अभिनेत्रीच्या वडिलांनी जान्हवी व खुशी या दोन बहिणींचे संगोपन केले. अभिनेत्री सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. अशातच तिने केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Post a Comment

0 Comments