'राहुल्याचा आयटम' म्हणून पत्नीला चिडवणं पडलं महागात, पत्नीने शांत डोक्याने काढला काटा


पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन अनेक वेळा पतीकडून पत्नीची हत्या झाल्याच्या घटना आपण पहिल्या असतील. मात्र पालघरच्या वाडा तालुक्यात एक वेगळी पण भयंकर घटना घडली आहे. या प्रकरणात पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

सतत दारू पिऊन तो तिच्या प्रियकराच्या नावाने तिला 'राहुल्याची आयटम' म्हणून नेहमीच चिडवायचा. त्यामुळे या जाचाला पत्नी कंटाळली होती. ती काम करायची त्यावरच तो जगत होता. शिवाय वरून अशा प्रकारची टोमणेबाजी तो सतत करत होता. शेवटी तिने मोठा निर्णय घेतला. आणि पतीचा करेक्ट कार्यक्रम केला. या घटनेमुळे पालघर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अजय बोचल आणि त्याची पत्नी अनिता बोचल हे वाडा तालुक्यातल्या मंडवा तळ्याचा पाडा इथे राहात होते. अजय ला दारूचे व्यसन होते. तो सतत दारूच्या नशेत असतं. त्याला काही काम धंदा नव्हता. पत्नी अनिता जे कमवेल त्यावर घर चालले होते. शिवाय दीड वर्षाचं मुलही त्यांना होतं. मात्र अजय अनितावर संशय घेत होता. तीचे राहुल या व्यक्ती बरोबर संबध असल्याचा त्याचा संशय होता. त्यामुळे तो सतत तिला 'राहुल्याची आयटम' म्हणून चिडवत होता. सतत हे चिडवणे तिला त्रासदायक होत होते.

हा त्रास कायमचा बंद करण्याचे तिने ठरवले. त्यासाठी तिने शांत डोक्याने एक कट रचला. पती रात्रीच्या वेळी दारू पिऊन घरी आला. त्यानंतर तो गाढ झोपला. त्याच वेळी तिने डाव साधला. झोपेत असलेला पती अजय याच्या डोक्यातच तिने कुऱ्हाडीने घाव घातला. त्याच त्याच्या डोक्यातून मेंदूही बाहेर आला. हे करत असताना तिने एकही पुरावा मागे ठेवला नाही.

गुन्ह्याची माहिती मिळताच वाडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अंथरुणावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अजयच्या डोक्यात अतिशय क्रूरपणे धारदार शस्त्राने वार केला होता. डोक्यातून मेंदू देखील बाहेर आला होता. शिवाय खोलीतील खिडक्यांना लावलेल्या प्लास्टिकचे पडदे ब्लेडने फाडलेले होते. त्यामुळे प्रथमदर्शनी बाहेरच्या व्यक्तीने घरात शिरून ही हत्या केल्याचे दिसत होते. मात्र तो अंदाज चुकीचा ठरला होता.

8 मे ला ही हत्या झाली. त्यानंतर पोलिसांना काहीच सुगावा लागत नव्हता. शेवटी तपास क्राईम ब्रँचकडे वर्ग झाला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून परिसरात चौकशी केली. त्यानंतर ही हत्या घरातल्याच व्यक्तीने केल्याची माहिती मिळाली. शिवाय अजय हा काहीच कामधंदा करत नव्हता आणि नेहमी दारू पिऊन त्याच्या पत्नीला त्रास द्यायचा ही बाबही समोर आली. शिवाय तो तिला तिच्या जुन्या मित्रावरून नेहमीच 'राहुल्याची आयटम' असे चिडवत असे हीबाब तपासात पुढे आली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार ही हत्या अजयच्या पत्नीनेच केली असावी असा संशय पोलिसांना आला.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून या हत्ये मागे राहुलची पत्नी अनिता बोचल हिचा हात असल्याचा संशय बळावला विशेष म्हणजे तिने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तिने खोलीतल्या खिडकीचे पडदे फाडून बाहेरच्या आरोपीने घरात प्रवेश करून आपल्या पतीचा खून केल्याचा बनाव केला होता. मात्र पोलिसांनी संशयित पत्नी अनिताला आपला खाक्या दाखवताच तिने गुन्हा कबूल केला. तसेच गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड आणि सांडलेले रक्त पुसण्यासाठी वापरलेला टॉवेल आरोपीने पोलिसांसमोर हजर केला. जवळपास वीस दिवसांनी पोलिसांनी या खुनाचा छडा लावला

Post a Comment

0 Comments