बसमध्ये प्रगती होत असून आता बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने एसटीने ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे.
वेबसाईट बरोबर या ॲपने करा तिकीट बूक..
प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाने npublic.msrtcors.com ही अधिकृत वेबसाइट सुरू केली आहे.
MSRTC Bus Reservation या मोबाइल ॲपवरूनही प्रवाशांना आरक्षण करता येणार आहे.
अडचण आल्यास 'या' क्रमांकावर करा संपर्क
एसटी बसचे ऑनलाइन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास ७७३८०८७१०३ या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. हा क्रमांक प्रवाशांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी २४ तास उपलब्ध असणार आहे.
तसेच ऑनलाइन आरक्षण करताना पैसे भरून देखील तिकीट न मिळाल्यास (पेमेंट गेट वे संदर्भात) या तक्रारींसाठी ०१२०-४४५६४५६ हा क्रमांक महामंडळाने प्रवाशांसाठी दिला आहे.
सवलतींचा मिळणार लाभ
या दोन्ही प्रणालीद्वारे प्रवाशांना अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतींचेदेखील आगाऊ आरक्षण मिळू शकते.
0 Comments