मुंबई |
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना चॅलेंज दिलं आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये मी आदित्य ठाकरे यांना चॅलेंज देतो, येणाऱ्या वरळी विधानसभेमध्ये त्यांनी डिपॉजिट जप्त करून दाखवावं. आदित्य ठाकरेंचं डिपॉजिट जप्त नाही केलं तर मी मिशा ठेवणार नाही, असं गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं आहे.
तुम्ही वीर जिजामाता नगरमध्ये येऊन बघा. माझ्यामागे किती शक्ती आहे. उद्धव ठाकरेंच्यामागे एकही माणूस दिसणार नाही. आदित्यच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
वरळीतून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढून दाखवावी. पहिल्या 25 टक्के मतमोजणीतच आदित्य ठाकरे रडत रडत घरी जातील. त्यांचं डिपॉजिट जप्त करणार, असं गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्यानं मोठा दणका दिला आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदावरून दोघांचीही गच्छंती करण्यात आली आहे. यावरही त्यांनी भाष्य केलं. आमचं संचालक पद रद्द केलेलं नाही, सर्व बातम्या खोट्या असून त्या बातमीचा निषेध करतो असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. तक्रारदार संदीप शिंदे हे शरद पवारांच्या ताटाखालचं मांजर असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, सदावर्ते आणि जयश्री पाटील यांची बातमी देत त्या संदीप शिंदेने पत्रकारांना उल्लू बनवलं. शरद पवार यांच्या ताटाखालचा तो माणूस आहे. अतिशय खोटी लबाड अशी ही बातमी आहे, असं सदावर्ते म्हणालेत.
0 Comments