टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यास गंभीर इच्छुक; पण...राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण होणार यावर मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. यामध्ये स्टीफन फ्लेमिंग, जस्टिन लँगर, गौतम गंभीर, व्हीव्हीएस लक्ष्मण अशी नावे सुद्धा स्पर्धेत आहेत. गौतम गंभीरचे नाव यात अग्रेसर मानलं जात होते. आता तर गंभीर  सुद्धा टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यास इच्छुक असल्याचं बोललं जातंय. मात्र जेव्हा त्याची निवड फिक्स मानली जाईल तेव्हाच गंभीर प्रशिक्षक पदासाठी अर्ज करेल. त्यामुळेच त्याने अजून अर्ज दाखल केलेला नाही.


खरं तर भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक  राहुल द्रविड यांचा कार्यकाळ फक्त 2024 च्या T20 विश्वचषकापर्यंत आहे. त्याचवेळी द्रविड पुन्हा या भूमिकेसाठी अर्ज करणार नाही, तर व्हीव्हीएस लक्ष्मणलाही प्रशिक्षक होण्यात रस नसल्याचे समजते. याशिवाय पूर्णवेळ प्रशिक्षकाची भूमिका निभावण्याची इच्छा नसल्यामुळे अनेक परदेशी खेळाडू सुद्धा प्रशिक्षक होण्यास इच्छुक नसल्याचे समजत आहे. तर दुसरीकडे गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने मात्र आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

गंभीरला बीसीसीआयकडून नियुक्तीचे आश्वासन हवंय –
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, गौतम गंभीरने भारताचा मुख्य प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली.आणि यासाठी तो कोलकाता नाईट रायडर्स सोडण्यासही तयार आहे. मात्र बीसीसीआय त्याला प्रशिक्षक बनवण्याचे स्पष्ट संकेत देईल तेव्हाच तो प्रशिक्षक पदासाठी अर्ज करेल असं बोललं जात आहे. जो कोणी टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षक होईल त्याचा कार्यकाळ 1 जुलै 2024 पासून 31 डिसेंबर 2027 पर्यंत असेल. नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या कार्यकाळात, टीम इंडिया एकूण 5 ICC ट्रॉफी खेळणार आहे, ज्यात चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या 2 चषकांचा समावेश आहे

Post a Comment

0 Comments