बार्शी | बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी खासदारावर कारवाई कराबेताल वक्तव्य करुन मुस्लिम समाजाच्या भावना दुखावुन तसेच जाती धर्मावर मते मागुन आदर्श आचार संहितेचा भंग केला. याप्रकरणी माजी खासदार रविंद्र गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंद व्ह- ावा, अशी मागणी सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने बार्शी नायब तहसीलदार  यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. लोकसभा निवडणुक रणधुमाळीमध्ये धाराशिव लोकसभा मतदार संघाचे घड्याळ चिन्ह घेऊन उभा असलेले अजित पवार गटाचे उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ एका सभेमध्ये माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील व जाती धर्मात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले आहे. तसेच त्या वक्तव्यामुळे जाती धर्माच्या नाव- ावर मते मागता येत नाहीत. याची पूर्ण कल्पना असतानादेखील जाणून बुजुन धर्माच्या नावाने मते मागण्याचे काम प्रा. रवींद्र गायकवाड यांनी घड्याळ चिन्हासाठी केलेलं आहे. माजी खासदार यांनी मुस्लिम समाजाच्या भावना भडकावल्याचे व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे, जे की आदर्श आचारसंहिता याचे उल्लंघन केले आहे.

ज्या क्षणी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारे भाष्य केले त्याच दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुस्लिम समाज बांधव रस्त्यावर उतरणार होत. परंतु सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. आपल्या रस्त्यावर उतरण्याने निवडणूक प्रक्रियेमध्ये व्यत्यय येऊ नये आणि निवडणूक प्रक्रियेत अडचण ठरू नये, या भावनेने आम्ही तो निर्णय निवडणुकी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माजी खासदार गायकवाड यांच्या बेताल वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी मुस्लीम समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना वसीम पठाण, जमील खान, शोएब सय्यद, इलियास शेख, शोयब काजी वसीम मुलानी आदी सकल मुस्लिम समाज बांधव बार्शी उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments