मुंबई इंडियन्स आयपीएलमधून आऊट



हैदराबादच्या संघाने फक्त ५८ चेंडूंत लखनौच्या १६५ धावांचे आव्हान लीलला पेलल्याचे पाहायला मिळाले.  हैदराबादच्या या विजयानंतर मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. कारण याबाबतचे एक समीकरण आता समोर आले आहे.

त्यामुळे या आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडणारा मुंबई हा पहिलाच संघ ठरला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आता प्ले ऑफमध्ये पोहोचू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
 
हैदराबादच्या संघाने या विजयासह दोन गुण मिळवले आणि त्यामुळे त्यांचे आता १४ गुण झाले आहेत. हैदराबादने फक्त दोन गुण कमावले नाहीत तर हा सामना त्यांनी १० विकेट्स आणि ६२ चेंडू राखत जिंकला.  त्यामुळे हैदराबादचा रन रेटही आता चांगलाच वाढला आहे. त्यामुळे हैदराबादचा संघ हा १४ गुणांसह थेट तिसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहे आणि त्यांनी जवळपास प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. 

 लखनौच्या पराभव नंतर १२ गुणच राहीले आहेत. त्यामुळे त्यांचा संघ सहाव्या स्थानावर कायम आहे.  पण आता लखनौचे अजून दोन सामने बाकी आहेत. यामध्ये लखनौ आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना सर्वात महत्वाचा असणार आहे. 

कारण या दोन्ही संघांचे समान १२ गुण आहेत. या सामन्यात कोणताही संघ जिंकला तर त्यांचे १४ गुण होतील किंवा हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांचे १३ गुण होतील.

Post a Comment

0 Comments