राष्ट्रवादी ‘इतक्या’ जागांवर विजय मिळणार? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला


मुंबई |

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्ते देखील प्रचारात व्यस्त आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होत. आता त्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, उद्धव ठाकरे यांच्यावर संकट आल्यास त्यांना मदत करणारा पहिला व्यक्ती मी असेन. आता या वक्त्याववर शरद पवारांनी खरपूस शब्दांत टीका केली आहे. शरद पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेच्या काळात आपण त्यांची विचारपूस केली का? मोदी सगळ्यांबद्दल लाख बोलतील. पण आमची प्रार्थना आहे की, उद्धव ठाकरे यांना नरेंद्र मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये.

शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पन्हे एकदा चर्चा रंगली आहे. तसेच शरद पवार यांनी जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला किती जागांवर विजय मिळणार याचा थेट आकडा सांगितलं आहे.

सध्या महाराष्ट्रात परिवर्तन होताना दिसत आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 1 जागा मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसला पाच आणि एमआयएमला एका जागेवर विजय मिळाला होता. मात्र यावेळी चित्र वेगळे असणार आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात काँग्रेसला किमान 10 ते 12 जागांवर विजय मिळेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला 8 ते 9 जागांवर विजय मिळेल असा विश्वास त्यानी व्यक्त केला आहे.

यावेळी शरद पवार यांनी भाजपचा विजयाबद्दल कॉन्फिडन्स काय आहे हे देखील बोलून दाखवले आहे. आपल्या देशाचा पंतप्रधान कितीवेळा महाराष्ट्रात येत आहे. याआधी आम्ही कोणत्याही पंतप्रधानाला इतक्या वेळा महाराष्ट्रात येताना पाहिले नव्हते. मोदींचा हा तिसरा किंवा चौथा राऊंड आहे. यावरुन एक गोष्ट स्पष्ट समजत आहे की, त्यांना विजयाबद्दल कॉन्फिडन्स नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींना पुन्हा पुन्हा राज्यात यावे लागत आहे असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments