ऑनलाइन जॉबच्या नावाखाली धाराशिवमध्ये महिलेची साडेसात लाखाची फसवणूक


धाराशिव |

ऑनलाईन जॉबच्या नादी लागल्याने शहरातील एका महिलेला साडेसात लाखास दणका बसला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर महिलेने सायबर पोलिसात धाव घेतली आहे.

आरोपी नामे-मो क्र 917352684594,919134610235, 918961382709, 918768788672, 91834819565, 91840936724, 916263168464, 919256303291, 423854109, 918583918418, 9754411521 चे धारक बॅक खातेधारक युनियन बॅक, तेलंगना ग्रामीण बॅक, इंडीयन ओव्हरसीज बॅक, कोटक बॅक, व स्टेट बॅक ऑफ इंडिया यांनी दि. 15.05.2024 रोजी ते दि. 17.05.2024 रोजी फिर्यादी नामे- सुलोचना गणेश जाधव, वय 28 वर्षे, रा. नेहरु चौक धाराशिव ता. जि. धाराशिव यांना जॉबची ऑफर आहे असे सांगुन टेलीग्राम ग्रुपला जॉईन करुन वेळोवेळी टास्क चे टेलीग्रामवर मेसेज देवून टास्कचे नावाखाली ज्यादा रिटर्न चे आमीष दाखवून वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले.

फियादी यांनी 8 ट्रान्जेक्शन द्वारे 7,42,000₹ भरुन त्या बदल्यात नमुद आरोपीने फिर्यादीस रक्कम न मिळाल्याने फसवणुक झाली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुलोचना जाधव यांनी दि.28.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420, सह कलम 66(सी) (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2008 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments